मला माफ कर – ३

swami-samarth-images-4.jpg

चित्रसौजन्य : http://www.swamisamarthimages.com

खूप पळवलंस रे मला. चकवा. चकवा खात राहिलो मी. पण तू साथ सोडली नाहीस. इतका कसा रे धाडसी तू?  हो! आता देव आहेस म्हणजे धाडसी असणारंच. तुला कधी राग आला नाही का माझा? जेव्हा मला देवळात कुणी नमस्कार करायला सांगायचं, जेव्हा सत्यनारायण पूजेला बसण्याआधी, “तुझ्या मनात काय संकल्प आहे तो देवाला सांग हं नक्की”असं कुणी म्हणायचं तेव्हा मनातल्या मनात कुत्सितपणे हसत मी म्हणायचो, “छे! असे संकल्प सोडून थोडी आयुष्यातल्या अडचणी सोडवणार आहे तो?”, जेव्हा तुझ्या कुठल्याश्या मंदिरात लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहून मी कंटाळून आत जायला नाकारायचो, जेव्हा घरचे पिकनिक स्पॉट ऐवजी एखाद्या धार्मिक स्पॉटला व्हिझिटचा बेत करायचे आणि माझ्या मनात यायचं, “आता हे कोणतं नवीन गाव आणि नवीन देव शोधून काढलाय!” ह्या आणि अशा असंख्य वेळी, खरंच तू कधी रागावला नाहीस का रे तुझ्या ह्या अतिसामान्य पामरावर?

“छे! असे संकल्प सोडून थोडी आयुष्यातल्या अडचणी सोडवणार आहे तो?”

एखाद्या सिनेमातला नायक जसा इतरांनी समजावूनही, स्वतःला अतिशाहणा समजत, सगळ्यांना पायदळी तुडवत, जे हवं ते करायला अधीर झालेला असतो, त्याला मिळालेल्या ज्ञानाचा दंभ मिरवीत ‘मी’पणाचा डोंगरावर चढत जातो आणि शेवटी त्याचा ‘अहं’पणा एखाद्या ज्वालामुखीतून ओघळणाऱ्या लाव्याप्रमाणे सगळयांवर आग ओकू लागतो, तसा मी सुद्धा क्षणिक मिळालेल्या यशापोटी देवालाही चॅलेंज करत निघालो होतो. ‘मला सगळं माहितीये’ ह्या भ्रामक कल्पनेला बाळगून जेव्हा मी हा डोंगर चढत होतो, तेव्हा माझ्या प्रश्नांची अगदी अचूक उत्तरे देणारी, मार्गदर्शन करणारी माणसं माझ्या साथीला असूनही मी ठार आंधळा झालो होतो. कुणीतरी सांगितलं शहाणपण ऐकून वागण्यापेक्षा स्वतः अगदी अभिमानाने निर्णय घ्यायची जणू हुक्कीच आली होती मला. बरोबर असो चुकीचे, कुणाचे ही ऐकायचे नाही! झालं!

आज ‘देऊळ बंद’ पहिला. इथेही आमचे घोडे आडलेच! सोलापुरात कुणीतरी हा सिनेमा दिला होता पेन ड्राईव्ह मध्ये. पण आम्ही म्हणजे फॉरव्हर्ड, खूप शिकून शहाणे झालेले, म्हटलं हा सिनेमा पाहून करायचंय काय? ठोकलं ‘शिफ्ट+डीलीट’! पण आज इथे परदेशात बसून ‘देऊळ बंद’ एकटे पाहावे लागले. देवाला ही हरवून स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उन्माद करत एखाद्या जंगलात कहर माजवणाऱ्या पिसाळलेल्या हत्तीसारखा, सगळ्यांना कस्पटासमान वागवणारा हा ‘नासा’ चा एवढा बडा शास्त्रज्ञ राघव शास्त्री, शेवटी आलाच ना देवाच्या पायाशी! अॅम्ब्युलन्स घेऊन निघाल्यावर वाटेत अपघातग्रस्त झालेल्या पतीचे प्राण वाचवायची विनवणी करणारी ती तेलगु बाई, गाडी खराब झाल्यावर आडवाटेवर देवदूतासारखा भेटलेला मेकॅनिक वल्लभ आणि गाणगापूरात गुरुचरित्राचे पारायण करणारा (कोण कुठला) तो इंग्रज! वरवर पाहता अगदी सर्वसाधारण आणि अगदी ‘टिच्चू’ वाटणारी ही अशीच कुठे न कुठे भेटलेली माणसं.

हा ‘नासा’ चा एवढा बडा शास्त्रज्ञ राघव शास्त्री, शेवटी आलाच ना देवाच्या पायाशी!

सिनेमातल्या नायकालाही त्यांचं महत्व अगदी शेवटपर्यंत कळलं नाही आणि मला ही नाही. पण तो सिनेमा होता आणि माझे आयुष्य हे एक वास्तव. सिनेमात अवघ्या जेमतेम तीन तासात बऱ्याच गोष्टी घडून जातात. वेळेचे मापक सिनेमात खऱ्या आयुष्यापेक्षा कित्येकपट  वेगाने धावत असते. सीन बदलतो तसा वेळही खूप पुढे सरसावलेला असतो. पण खऱ्या आयुष्यात मात्र एखाद्या घटनेनंतर जिव्हारी झोंबणारी टोचण मात्र आपल्याला सेकंद नि सेकंद ‘खरी खुरी’ अनुभवावी लागते. टॉकीजच्या बाहेर पाउल ठेवताक्षणी आपलं खरं आयुष्य सुरु होतं. मन जरी काही अंशी सिनेमात घडलेल्या घटना आणि त्या पात्रांमध्ये गुंतून राहतं, पण त्या टॉकीजमधल्या एसितल्या गारव्यातून आपलं भौतिक शरीर मात्र केव्हाच बाहेर पडत एकमेकांच्या श्वासोच्छ्वासमुळे होणाऱ्या त्या गर्दीच्या घुसमटीचा अनुभव घेत असतं. ‘मन उशिरा भानावर येणं’ हे काय फक्त माझ्याच बाबतीत नेहमी घडतं असं नाही. एक सर्वसाधारण संवेदनशील माणूस अश्याच काहीश्या टप्प्यातून धावत धावत सरतेशेवटी भानावर येतो. मी ही आलोच भानावर. सगळेच येतात. पण काहींना थोडासा उशीर होतो, आणि दरम्यान न भरून येणारं नुकसानही होऊन बसतं. देवावर विश्वास नसला तरी ‘तो’ मात्र आपल्या भक्तांना वाऱ्यावर सोडून देत नाही. पुन्हा त्याच्याकडे परतण्यासाठी आपल्याला पुन्हा ‘त्याचीच’ गरज लागते. आणि आपल्या ह्या मग्रूर भटकलेल्या भक्तानं स्वतःचे भले मोठे नुकसान करून घेऊ नये आणि याचकरूपी नव्हे तर अंतर्ज्ञान आत्मसात करून परत आपल्याकडे परतावं, याची ही काळजी बिचाऱ्या त्या देवालाच!

ह्या सगळ्यातून मला मिळालं काय, हे थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी दोन वाक्यात सांगता येईल. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, भले अगदी चालता चालता सहज नजरेत पडणारी व्यक्ती असो वा आपली कुणी जवळची व्यक्ती असो. ह्या प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जीवनात येण्यामागे एक सूचक कारण असतं. आणि ते कारण अगदी इटुक-इवले का असेना, पण अशाच  इटुक-इवल्या करणातून उमगणारे शहाणपण आणि त्यातून भविष्यात पुसट अशी दिसणारी वाट आपलं आयुष्य बदलून टाकते. हे मला कळलं आहे.

म्हणूनच मी केलेल्या रिक्षेच्या त्या रिक्षाचालकाचे, घरासमोर जाणाऱ्या भाजीवाल्याचे, रस्त्यात चालताना मधेच आडव्या येणाऱ्या त्या सायकलवाल्याचे, समोरून गाडी चालवताना अचानक ब्रेक मारणाऱ्याचे, अडचणीच्या वेळी पाचशेच्या सुटे देणाऱ्या त्या दुकानदाराचे, भयानक मानसिक चिडचिड झाली असतां कुणी सहज चहा पाजणाऱ्याचे, रागात असतांना अनाहूतपणे कानावर पडणाऱ्या त्या बाळाच्या आवाजाचे, अत्यंत एकाकी वाटत असताना फोन करणाऱ्या त्या मित्राचे, कुठे आशेचा लवलेशही दिसत नसताना प्रेरणेचे दोन शब्द बोलणाऱ्या माझ्या शिक्षकांचे, घरी आल्या आल्या हातात चहा आणून देणाऱ्या आईचे आणि ह्या सगळ्यांना माझ्या आयुष्यात आणणाऱ्या त्या ‘देवाचे’ मी मनस्वी आभार मानतो. कित्येक व्यक्ती मला विसरल्या ही असतील, पण आज त्या ‘देवा’मार्फत त्या सगळ्यांना आज हेच सांगायचं आहे, मी तुम्हाला कधी दुखावलं असेन तर – मला माफ कर.

कौन सा सवाल लिए कंधे पर, भटक रहा है तू दर दर,

उसका जवाब दिया ख़ुदा ने, ख़ुद तेरे साथ रह कर.

मयूर रे. इंडी

३१ डिसेंबर २०१६, शनिवार, लिव्हरपूल, यु.के.
Advertisements

Banished ~ Out & Within

तस्लीमा नसरीन. एक विलक्षण धाडसी लेखिका जीने आपल्या आयुष्याची अवघी दशके निर्वासनात घालवाली. चुर्नि गांगूली ने त्यांच्या आयुष्यावर ‘निर्बाशीतो’ हा सिनेमा यंदा बनवला. त्यांच्या या सिनेमा पाहून सुचलेले काही शब्द!

The Inner Oblivion | Le Oblivion Intérieure | النسيان الداخلي

A still from Nirbashito's Amar Sonar Bangla Churni Ganguly (as Taslima Nasreen) in a still from her film Nirbashito’s tune ‘Amar Sonar Bangla’

Part One

As I reached Mumbai’s CSI Airport for my first ever flight to Dubai, there was nothing going in my mind except me physically sitting on a gateway chair waiting for the gates to open. It was a same state of humming through my body and brain, numb sensations. Surpassing all the injustice, pain and agony of my past, I had said ‘yes’ to work out of India. No one aside.

I never knew actually what I was upto, whether I was really be doing the job I had been assigned, or am I going to be another victim of a ‘dream job’ everyone dreams of. The only ‘me’ was within me, sole and bare. It’s almost impossible for me to express what I was feeling at that instance but what I knew was…

View original post 788 more words

English is sexist!

आपल्या इंग्रजी ब्लॉगवरील पहिला लेख. जरूर वाचा. अभिप्राय कळवा.

The Inner Oblivion | Le Oblivion Intérieure | النسيان الداخلي

Every single damn thing here is somehow forcibly conjoined with some or the other prejudist thought or its manifestation of a human mind. There’s nothing such act as ‘involuntary’. Here anything done has to be interpreted. Though as we see every human mind interprets things as his or her quotient of intellect, there are a few things in my city which probably hold the same rank of interpretation among every human residing here.

The worst fear is that you own inside you! (Picture Courtesy: projectshutupandsmile.files.wordpress.com) The worst fear is that you own inside you! | Picture Courtesy: projectshutupandsmile.files.wordpress.com

There’s nothing such act as ‘involuntary’

I was talking to a friend today and out of our conversation, came a thing that impelled me to write this piece. Childhood! Aah! Such a lovely concept, Isn’t it? But, in our Indian society childhood is rather less remembered by the virtue of ‘innocence’, ‘tenderness’ or ‘love’; but more by ‘domestic violence’, ‘assault’ and ‘bullying’. I may soon…

View original post 471 more words

बदललंय काय?

csudhanwa

पूर्वी ‘ध’चा ‘मा’ केला,
तर एक पेशवा जीव गमावून बसला
आज माँ भेन केली,
तरीपण जीव जातो
मला सांगा बदललंय काय?

पूर्वी पतीबरोबर सती जायची प्रथा
आज उत्तरेत आॅनर किलिंगची भाषा
मला सांगा बदललंय काय?

५० वर्षांपूर्वी, आम्ही होतो मागासवर्गी
आजही आम्ही, आरक्षणाचे अधिकारी
मला सांगा बदललंय काय?

त्या काळी रावणाला दहा तोंडं
आज नेत्यांचे शंभर रंग
मला सांगा बदललंय काय?

तेव्हा होती शकुनीची कारस्थानं
आतंक्यांनी फोडली आज श्रद्धास्थानं
मला सांगा बदललंय काय?

द्राैपदीची वस्त्रं लुटली भर दरबारी
निर्भया आज मुकली जिवानी
मला सांगा बदललंय काय?

View original post

In the Shadows of my Realization

sienashadow

चित्रसौजन्य: kiplimochemirmir.wordpress.com

Who would had thought I would be born on this beautiful planet.
Who would had thought i would be blessed to be the descendant of ADAM AND EVE’S.
Who would had thought I would live the childhood as blessed as ever anyone cud,
Who would had thought I would get an opportunity,
to be a part of two great human beings like my dad and mom.
Who would had ever thought I had to share my parents’ love with the other two angels in my life in the form of my younger twin bro’s.
I had never thought I will be a postgraduate and working as a lecturer, the noble and most respected job ever.
Who would had thought I will be blessed with great friends, most hilarious cousins,
that’s what i realized, that’s what i came across in the storms of my thoughts ,
and experienced the closure and fullfilness in the shadows my Realization…
(Dedicated to all my family,  friends, cousins & teachers.)

1157584_613107605396873_1578743861_n

Vikrant Suhas Upase, Solapur.
10th September 2013, Tuesday
विक्रांतची ही नवी कविता प्रसिद्ध करताना मला तितकाच आनंद होत आहे जो पहिल्यावेळी झाला होता. त्याच्या कवितालेखनकौशल्याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. शब्दमांडणीचे सहजसोपे कसब तर त्याच्याकडे आहेच, परंतु अनाठायी अवघड शब्दांचा वापर करून वाचकांना खोटी भुरळ पडण्याचा प्रयत्न हा कवी कधीच करत नाही. अनाहूतपणे दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या रोजच्या जीवनातील अबोल पैलूंचे दर्शन विक्रांतच्या कवितेतून आपल्याला घडतात. अनोळखी असून ओळखीची वाटणारी, शब्द त्याचे असून ते आपले वाटणारे, कवितेतील पात्र अनोळखी असून आपल्यातलेच वाटणारे असे त्याचे वर्णन आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अघटीत प्रसंगांचा देखील रुपक प्रत्यय वेळोवेळी त्याच्या कवितेतून आपल्याला येत आला आहे. विक्रांतच्या पुढील वाटचालीसाठी त्याला मनस्वी अभीष्टचिंतन…  ~मयूर. (मस्क़त, ओमान)

मला माफ कर – २

चित्रसौजन्य: whatislove-2010.blogspot.com

चित्रसौजन्य: whatislove-2010.blogspot.com

धर्मांतरानंतर त्याला हिंदू मुलीशी कसं लग्न करता येणार होतं? सुधीरचं मन ते मान्य करायला तयार  होत नव्हतं. फार विचारांती त्यानी इतकं मोठं पाऊल उचललं होतं. आपण ज्या धर्मात जन्माला आलो तो धर्म सोडणे म्हणजे पुन्हा नव्याने जन्म घेण्यासारखच आहे. बाबा गेल्याचं असीम दुःख, नातेवाईकांकडून दुर्लक्षितता, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शनाचा अभाव आणि इतर बऱ्याच गोष्टींनी सुधीरला त्या ३३ कोटी देवांपासून तोंड फिरवण्यास भाग पाडलं होतं. पुण्याला जाईल तेव्हा प्रत्येक वेळी त्या दगडूशेठ समोर हात जोडून जोडून तो थकला होता. सुधीर स्वच्छंदी आणि आत्ममग्न राहण्यास शिकला होता. इतक्या उच्चशिक्षणानंतर त्याला नोकरीसाठी बरीच वणवण करावी लागली होती. पण आता सगळं ठीक होतं. मुंबईत नोकरी, चांगला पगार आणि मनाजोगी लाइफस्टाइल. सगळेच हवे तसे.

एका समधर्मीय मित्राकडून सुधीरसाठी एका मुलीचे स्थळ आले होते. इतके दिवस “मला मुलगी कोण देणार?” अशा विचारात असणाऱ्या सुधीरला ‘धीर’ मिळाला. मागाहून आई आणि घरची मंडळी काय म्हणतील याचा मुळी विचारच सुधीरने केला नव्हता. परस्पर एकटा जाऊन मुलगी पाहून आला. तो एक छोटेखानी साखरपुडाच होता. दोन्हीकडून पसंती सुद्धा झाली. लग्न ठरले शेवटी! सुधीरच्या घरच्या मंडळींना हे सगळं समजून घेणं खूप अवघड होतं. प्रथमदर्शनी विरोध दर्शवला नसला तरी सगळ्यांचा ह्या प्रकाराला प्राणांतिक विरोध होता.

सुधीरची सुट्टी संपताच तो मुंबईला परत गेला. त्याला जरी वरवर सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असलं तरी तसं ते मुळीच नव्हतं. मागाहून इथे घरी सुधीरसाठी आई कडून एक स्पष्ट संदेश आला, “तुला हे लग्न करायचं आहे. खुशाल कर. पण मग पुन्हा इथे पुण्यातल्या घरात अजिबात पाऊल ठेऊ नको. तुझी आई तुझ्यासाठी मेली”. सुधीरचा ह्या लग्नाविषयी इतका निर्धार झाला होता की तो मागे वळून पाहायला मुळी तयारंच नव्हता. सुधीर आता मोठा झाला होता. आर्थिकरित्या स्वतंत्र होता. घरातल्या ह्या प्रचंड विरोधाला सामोरं जाण्याचं धाडस त्याच्यात निश्चितंच होतं.

सुधीर “ती”चा चेहरा आठवून आनंदून जात होता. तिला मराठी वगेरे मुळीच येत नव्हतं. एकदा भेट झाली तेव्हा तिच्या तोंडून हिंदीचे दोन चार शब्द कानावर पडले तेवढंच काय ते. मूळ धर्मात न जन्मलेल्या सुधीरसोबत आपलं अवघं आयुष्य काढायला ती तयार झाली होती. सुधीर तिचा एकदाच कटाक्ष टाकून पाहिलेला चेहरा आठवून स्वतःच लाजून जायचा. भविष्यातील एकत्र दृश्यांच्या स्वप्नात तो रंगून जायचा. तो आता फक्त पुढचा विचार करत होता. आई ला स्पष्ट “नाही” देखील म्हणून सुधीर मोकळा झाला. “ती”ची आठवण आली तरी “त्यांच्या” संस्कृतीत लग्नाआधी मुलीशी बोलणे म्हणजे घोर पाप. फोन करून “ती”च्या तोंडून एखाद-दोन शब्द ऐकण्याची देखील सोय नव्हती. पण सुधीर मात्र मनोमनी “ती”ने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला मान देत आपला भूतकाळ त्याग करायला तयार झाला होता. प्रथमदर्शनी प्रेम म्हणजे फक्त बाह्यांगाची आपल्या डोळ्यांवर पडलेली भोवळ असते. पण सुधीरच्या बाबतीत हे निखळ प्रेम होतं. “ती” सुद्धा माझ्याविषयी असाच विचार करत असेल का? माझ्या स्वप्नांत रंगली असेल का? असेल सुद्धा. पण सुधीरला ते कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. पण “ती”च्यावर त्याचा खूप अगाध विश्वास होता. आपण ज्या घरी २५ वर्ष राहिलो, वाढलो, शिकलो, त्याला मागे टाकून, घरच्यांशी इतका मोठा द्रोह करून तो “ती”च्या निखळ प्रेमात पडला होता.

काही दिवसांनी मात्र सुधीर खूप अस्वस्थ झाला. इतके दिवस तो आईशी बोलण्यावाचून कधी राहिलाच नव्हता. पण जेव्हा जेव्हा असे विचार त्याच्या मनात येई, तेव्हा तो लगेचंच “ती”चे ते टपोरे डोळे आठवायचा, तिचे ते घाबरे बोल आठवायचा. आणि मग त्यात विरून जायचा. मग पुन्हा ऑफिसातून संध्याकाळी घरी आला की नेहमीप्रमाणे आईचा नंबर त्याच्याकडून अनाहूतपणे फिरवला जायचा. पण एक दोन रिंग झाले की त्याच्या लक्षात येई की तो आता आपला मार्ग नाही. मग तो फोन अगदी न दिसेल अशा जागी ठेवून देई. पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तस-तसं सुधीर खूपच अस्थिर झाला. सैरभैर वागू लागला. एकीकडे भूतकाळ आणि दुसरीकडे भविष्यातला दिसणारा “ती”चा मृगजळ.  त्याच्या आणि “ती”च्या मिलनात काही महिन्यांचा कालावधी उरला होता.

पण आता मात्र हद्द झाली. असंवेदनशीलतेची, आईशी कृतघ्न होण्याची. सुधीरला आईचा अबोला आतून कापत होता, अस्वस्थ करीत होता. त्याने “ती”च्या वडिलांना फोन करून लग्नासाठी नकार दिला. संपलं सगळं. आजवर इतक्या लोकांच्या आत्म्याचा अंत पाहिला, पण आज शेवटी सुधीरला हे पाऊल उचलावं लागलं. आपल्या आईसाठी, तिने आपल्यासाठी केलेल्या संघर्षासाठी. सुधीरच्या अंतर्मनात चाललेल्या या द्वंद्वाचा आज अंत झाला.

पण सुधीरने स्वीकारलेल्या धर्मातल्या “खुदा”ला हे मुळीच मंजूर नव्हतं. त्याचातर स्पष्ट हुकुम होता – लग्न करायचं असेल तर फक्त समजातीय मुलीशीच. म्हणून सुधीरचा हा सारा अट्टाहास. पण स्वर्गात लिहिलेल्या कायद्यांना ह्या नतद्रष्ट दुनियेत अमलात आणणं खुपंच कठीण असतं. सुधीर फक्त सरळमार्गी धर्मपालन करत होता. पण धर्म ही बाब फक्त वैयक्तिक राहू शकत नाही का? तिला स्वतःपुरता राहू देणं शक्य आहे का? अशाच काही विचारांचे काहूर सुधीरच्या मनात माजले होते. पण तो हतबल होता. त्याचं हृदय ही मांस आणि पेशींनी बनलं होतं, दगडानी नव्हे. त्याने माघार घेतली. मन मारून.

आज तो आपल्या आधीच्या आयुष्यात रमला आहे. चेहऱ्यावरून आनंदी दिसतो. पूर्वी दुभंगलेली नाती पुन्हा जोडली गेली आहेत. मधल्या काळातल्या “ती”च्या आठवणींनी भरलेला त्याच्या हृदयातला कोपरा दुर्लक्षित झाला आहे. ह्या सगळ्यात बिचाऱ्या “ती”चा काय दोष? आपलं अखंड आयुष्य “ती”ने सुधीरला देऊन टाकलं होतं.

आजही अधून मधून त्या हृदयातल्या कोपऱ्यातून “ती”च्या आठवणी अलगद बाहेर येऊन सुधीरच्या डोळ्यांसमोर उभे ठाकतात. पण सुधीर मात्र त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करतो. पाहून न पाहिल्यासारखं करतो. कारण त्याच्याकडे त्या आठवणींच्या रुपात उभ्या असलेल्या प्रश्नचिन्हाला ‘मला माफ कर’ असं म्हणण्याशिवाय देण्यासाठी काहीच उत्तर नसतं.

(एक महत्वाची नोंद: वैयक्तिक अनुभवांतून येणारं लेखन करणं तसं काहीसं सोपं आहे. पण आपल्या आणि इतरांच्या अनुभवांची सांगड घालून एक रूपक आणि प्रतीकात्मक लेखन करणं थोडसं अवघड. त्यातलाच हा लेख म्हणजे माझा त्या दृष्टीने पहिला प्रयत्न. हा लेख प्रकाशित करताना आज “मातृदिन” आहे हा योगायोग म्हणावा की आणखी काही? प्रेम आणि मातृप्रेम यांच्या द्वंद्वयुद्धात अडकलेल्या सुधीरनी मातृप्रेमाचा पुरस्कार करून ‘आई’ला सर्वश्रेष्ठ मानलं. पण सुधीरच्या त्या प्रेमळ हृदयाचा कानोसा घेणं ही तितकंसं जरुरीचं आहे. सुधीरचा निर्णय बरोबर की चूक ह्याऐवजी त्याच्या ह्या निर्णयाचा परिस्थितीनुरूप विनिमय करून त्या दृष्टीकोनातून विचार केला की हे कोडे उलगडणे आपल्याला सहजशक्य होईल. मी आजवर पुष्कळ मुलींकडून त्यांना मुलांनी सोडल्याचे आणि फसवल्याचे (?) बरेच किस्से ऐकले आहेत. सुखकर आयुष्य आणि घरच्या इस्टेटीखातर त्यानी मला सोडलं, असा ह्या मुलींचा आरोप असतो. पैसा, घर ह्या पलीकडेही त्या मुलाला एक आई असते, तिचे सर्वार्थ त्या मुलात असते, तो मुलगा म्हणजे त्या आईचा आत्मा असतो; हे सगळं ह्या मुली अगदी सहज विसरतात. त्या सांगून न समजणाऱ्या मातृप्रेमाला दुर्लक्ष करणं म्हणजे त्या मुलांनी जवळ जवळ आत्महत्या केल्यासारखंच आहे.
अशा पद्धतीचा लेख लिहिण्याची उर्मी माझ्यात निर्माण केल्याबद्दल नीलिमा काकू तुझे खरंच खूप आभार. इतके दिवस अर्धवट टांगणीला लागलेले सुधीरचे भविष्य आज निश्चित झाले. हा प्रतीकात्मक सुधीर मात्र नक्कीच माझे आभार मानत असणार! पुनःश्च धन्यवाद)  

मयूर रे. इंडी

१२ मे, २०१३ रविवार 

मस्क़त, ओमान.

हल्ली प्रकाश नकोसा वाटतो…

हल्ली प्रकाश नकोसा वाटतो...‘अनुदिनी’ – लेख ४ था

हल्ली प्रकाश नकोसा वाटतो. का कोण जाणे? नको वाटतो तो लख्खपणा त्याचा. माझ्या डोळ्यांना तो बऱ्याच वेळा आवडेनासा होतो. अंधारात आणि अंतरातल्या काळोखात रमलेल्या माझ्या ह्या वेडसर मनाला जिवंत करतो हा प्रकाश. खोलवर आतून बंद असलेल्या डोळ्यांना तो उगाचंच उजाळा देतो. हा जेव्हा डोळ्यांवर येऊन आदळतो तेव्हा पापण्या मिटून ठेवल्या  तरीही एक लालसर छटा आतून दिसत राहते, माझ्या पापण्यांमधून उभ्या तिरप्या वाहिन्यांमधून वाहणाऱ्या त्या रुधीराचाही रंग मग अलगद एक कोमट अनुभूती देऊन जातो. हा सततचा प्रकाश डोळ्यांना खुपत राहतो नेहमी नेहमी.

मी अंधारात असलो तरीही माझ्या मनाच्या पटांगणात भूतकाळातल्या काही गोष्टी आणि त्यांतील पात्र खेळ मांडत असतात. मनाच्या अंधाऱ्या खोलीत एखादी अत्तराची कुपी उघडावी तसा त्या सर्व आठवणींचा स्मृतिगंध चोहुकडे दरवळू लागतो. आणि मग अचानक हा प्रकाश येतो नि त्या भोवताली पसरलेल्या सुगंधाला क्षणार्धात नाहीसं करतो. मग मनाला वर्तमानाचे चटके बसू लागलात. ज्या वर्तमानासमोर मी कृतीशून्य, हतबल, एकाकी उभा असतो. भूत-भविष्यातल्या त्या मोहक, रंजक, अनभिज्ञ पात्रांचा जणू खूनच होतो. डोळ्यांवर पडणाऱ्या त्या प्रखर प्रकाशकिरणात माझ्या डोळ्यांपुढे वावरणारी सर्व पात्रे कुठे कशी विरून जातात हे मला देखील समजत नाही की उमजत नाही. लहानपणी आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांची, त्यांच्या अनुभवांची आणि त्यांच्या एकूणच अस्तित्वाची जाणीव मला या अंधारात होत राहते. माझं मन देखील त्या कोरीव आठवणींच्या भोवती रमून वर्तमानातल्या त्या भयानक आणि असहाय्य वेदना विसरून जातं. लोक दारू पिऊन, चरस, अफीम नि काय काय भलते प्रकार खाऊन मेंदूला भूल देण्याचा प्रयत्न करतात. पण मला हे सारं करण्याची काहीच गरज नाहीये. हा अंधार मला तशीच भूल देत असतो. अगदी “चकटफू”!

परदेशी नोकरी म्हणजे चैनीचा पण तितकाच एकाकी अनुभव आहे. माझ्या ऑफिसमधून थेट एक रस्ता जातो तो माझ्या घरी. आणि तोच पुन्हा परत मला ऑफिसात आणतो. माझा आणि ह्या प्रकाशाचा संबंध येतो तो फक्त तेवढ्या वेळापुरताच. आणि तो ही दिवसा. डोळे उघडे असून, लख्ख प्रकाश असून मला काहीच दिसेनासे होते. त्या प्रकाशकिरणांमुळे जणू माझ्या मेंदूत सहस्र शंखध्वनिंचा नाद घुमू लागतो. नकोये, नकोये मला हे वर्तमान! पण त्याला थांबवणे देखील माझ्याच्यानी शक्य नाही.  रात्री मात्र रस्त्यांवर पथदिवे नसल्याने माझी आणखीन चंगळ होते.  बाकी मी स्वतःला त्या अंधाराचा मित्रंच बनवून टाकलाय. कारण हा अंधार मला अगदी कुठेही भेटतो. मी त्याला हाक दिली कि तो आलाच म्हणून समजा. आणि त्याला जास्त शोधावं ही लागत नाही; प्रकाशाला दूर केला की माझ्या शेजारी हा कधी येऊन उभा राहतो मला देखील कळंत नाही. एरवी उजेडाचा आणि त्या प्रकाशाचा खूप लोकं अट्टाहास धरतात. पण मला त्याचं काहीच अप्रूप नाहीये. मला आयुष्यात सर्व डोळस अनुभवं देणारा हा माझा अंधार माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मला त्या प्रकाशाचा मत्सर का वाटावा?

माझं अंधारासोबत असलेलं सख्य काही नवीन नाही. मी लहान होतो तेव्हापासूनच तो माझ्या आवडीचा झालाये. लहानपणी वाड्यात सगळे एकत्र बसलेलो असताना अचानक दिवे जायचे. संपूर्ण वाड्यातून एक लयबद्ध ओरडा ऐकू यायचा “लाईट गेले!” आणि आम्ही तसेच अंधारात बसायचो. प्रकाश नसल्याने चेहरे दिसायचे नाहीत, पण ते आवाज मात्र ऐकू यायचे. तेच आवाज आजही अंधारात ऐकू येतात. त्यांच्या चाललेल्या संवादात माझा वाटा फक्त ऐकण्या पुरता असतो. पुन्हा दिवे येताच सगळी मंडळी उठून आपापल्या घरी निघून जायची. पण त्या सगळ्यांसोबत घालवलेला तो अंधारातला वेळ मात्र आठवणीत राहिला आहे. इतके सगळे लोक, त्यांचे कानी पडणारे संवाद आणि त्यांचे अनाहूत अस्तित्व सोडून ह्या धकाधकीच्या वर्तमानात कुणाला यावेसे वाटेल? भौतिक रित्या मी वर्तमानात वावरत असलो तरी या अंधारामुळे मी त्या आठवणींच्या खोलीत चाललेल्या प्रयोगांचा एकुलता एक प्रेक्षक असतो. त्या प्रयोगांतील पात्रांना माझे अस्तित्व कधीच जाणवत नसेल, पण मी त्या सर्वांमध्ये मुक्तछंद विहार करत राहतो. तीच भावना सतत कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण हा प्रकाश कधी कधी अडवा येतो नि माझ्या ह्या सुखकर प्रवासात बाधा घालतो.

कालच इथल्या नोकरीचा राजीनामा दिला. नोकरीचा, त्यासोबत येणाऱ्या एकाकी भावनेचा नि त्या भयाण दुःखांचा देखील. इथेही हे करण्याचं धैर्य दिलं ते माझ्याभोवती असलेल्या अंधारानीच. मध्यरात्रीच्या सुमारास भोवती साचलेल्या निरव काळोखात मी पाठवलेले राजीनाम्याचे पत्र प्रेषकापर्यंत अगदी सुखरूप पोचले. इथले जगणे संपले. आता पुढे काय? हा असा प्रश्न कुणाला विचारण्याची मला कधी गरजच भासली नाही! आणि आजही ती भासणार नाही, कारण माझ्या सोबत असलेला अंधारच माझ्या भविष्यातल्या वाटेवर लख्ख प्रकाशझोत टाकताना मला दिसतोये.

एक महत्वाची नोंद:
बर्याच जणांना असे वाटेल की हा लेख म्हणजे नैराश्यवादाचा कळस आहे. किंवा बरेच जण हा लेख वाचून मला अतिशय निराशावादी (pessimistic) देखील समजतील. पण तसे बिलकुल नाहीये. ह्या लेखातून मी अंधाराचे तोंड भरून कौतुक केले असले तरी प्रस्तुत लेखात ‘अंधार’ हा शांततेचा, अंतर्मुख आणि आत्ममग्न असल्याचा प्रतिक आहे, नैराश्याचा नाही. एकटेपण आणि आणि शांतता ही आयुष्यात स्वतःबद्दल योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत करते, हेच मला सांगायचे आहे. आजूबाजूच्या सततच्या टीकांमुळे आपण वाईट गोष्टींना आणि त्यासोबत येणाऱ्या दुःखांना विकारक्षम (vulnerable) होतो. म्हणून स्वपरीक्षण करायला, योग्य तो निर्णय घ्यायला ही शांतता, एकटेपणा जरुरीचा आहे.
मयूर रे. इंडी
१७ फेब्रुवारी २०१३, रविवार.
मस्क़त, ओमान.